Honeymoon Destinations : थंड हवा अन् बर्फाची चादर; कडक उन्हात 'या' ठिकाणी प्लान करा हनिमून, जोडीदार होईल खुश

Shreya Maskar

दार्जिलिंग

दार्जिलिंग हे ठिकाण 'पर्वतांची राणी' म्हणून ओळखले जाते. दार्जिलिंग चहाच्या मळ्यांसाठी, हिमालयाच्या पर्वतरांगेच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Darjeeling | pinterest

मसुरी

मसुरी हे हिल स्टेशन उत्तराखंडमध्ये वसलेले आहे. 'केंपटी फॉल्स', 'मॉल रोड' आणि 'गन हिल' सारख्या आकर्षणांसाठी ओळखले जाणारे हे ठिकाण, सुट्टीच्या दिवसांत पर्यटनासाठी एक लोकप्रिय आहे.

Mussoorie | pinterest

शिमला

शिमला हनिमूनसाठी सुंदर लोकेशन आहे. शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. हे ठिकाण 'मॉल रोड', ऐतिहासिक 'रिज' (Ridge), 'ख्रिस्त चर्च', 'कालका-सिमला टॉय ट्रेन'चा प्रवास आणि कुफरी येथील साहसी उपक्रम यांसाठी प्रसिद्ध आहे.

Shimla | pinterest

नैनिताल

नैनितालला 'भारताचा सरोवरांचा जिल्हा' असे म्हटले जाते. हे ठिकाण 'नैनी सरोवर', आल्हाददायक, थंड हवामान आणि कुमाऊँ हिमालयाच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे बोटिंगचा सुंदर आनंद घेता येतो.

Nainital | pinterest

नंदी हिल्स

'नंदी हिल्स' हे ठिकाण सूर्योदयाच्या चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण थंड हवामान, ट्रेकिंगचे मार्ग, सायकलिंगचे मार्ग आणि 'टिपू ड्रॉप' नावाच्या नयनरम्यस कड्यावरील धोकादायक ठिकाणासाठी विशेष ओळखले जाते.

Nandi Hills | pinterest

कूर्ग (कोडागु)

'भारताचे स्कॉटलंड' आणि 'भारताचा कॉफीचा कप' (Coffee Cup of India) म्हणून कूर्ग (कोडागु) ओळखले जाते. कॉफीच्या हिरव्यागार मळ्यांसाठी, धुक्याने आच्छादलेल्या टेकड्यांसाठी आणि पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगचे साहसी अनुभव येथे घेता येतो.

Coorg | pinterest

कोडाईकनाल

'थंड हवेच्या ठिकाणांची राजकुमारी' (Princess of Hill Stations) म्हणून कोडाईकनाल हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटातील धुक्याने वेढलेल्या आणि वनराईने नटलेल्या टेकड्यांसाठी, ताऱ्याच्या आकाराच्या 'कोडाईकनाल सरोवरा'साठी हे ठिकाण ओळखले जाते.

Kodaikanal | pinterest

टीप

वरील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Honeymoon Destinations

NEXT : गेटवे, मरीन ड्राईव्ह नाही; Summer Vacation मध्ये फिरा मुंबईतील 'हे' ५ वन डे पिकनिक स्पॉट्स

Mumbai Tourism | saam tv
येथे क्लिक करा...