Mumbai Tourism : गेटवे, मरीन ड्राईव्ह नाही; Summer Vacation मध्ये फिरा मुंबईतील 'हे' ५ वन डे पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरीवलीमध्ये आहे. स्टेशनपासून रिक्षाने तुम्ही ५ मिनिटांत पोहचाला. येथे बोटिंग , सायकलिंग, ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

Sanjay Gandhi National Park | google

हँगिंग गार्डन्स

हँगिंग गार्डन्सला फिरोजशाह मेहता गार्डन्स असेही म्हणतात. मलबार हिलमध्ये हे उद्यान आहे. प्राण्यांच्या आकारातील वैशिष्ट्यपूर्ण कुंपणांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सूर्यास्ताचा सुंदर नजारा दिसतो.

Hanging Gardens | google

कमला नेहरू पार्क

कमला नेहरू पार्क हे 'म्हतारीचा बूट' म्हणून ओळखले जाते. येथून मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. लहान मुलांना येथे खूप मजा- मस्ती करता येईल.

Kamala Nehru Park | google

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी हे ठिकाणे युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये येते. भगवान शंकरांना समर्पित असलेल्या आणि ५ व्या ते ७ व्या शतकातील भव्य बेसाल्ट शिल्पकाम असलेल्या शैलगृहांसाठी प्रसिद्ध आहेत.

Elephanta Cave | google

पवई तलाव

१९ व्या शतकातील एक कृत्रिम जलाशय असलेले पवई तलाव हे एक शांत आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे पाहायला मिळतात. जवळच एक हिरवेगार उद्यानही आहे.

Powai Lake | google

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटीवर लोक सायंकाळी सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला येतात. तसेच समुद्रकिनारी फिरत तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.

Girgaon Chowpatty | google

वर्सोवा समुद्रकिनारा

मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारा हा मुंबईतील शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. तुम्ही येथे घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.

Versova Beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : कोकणचा गौरव! 'विजयाचा किल्ला' म्हणून ओळखले जाते 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा...