Manasvi Choudhary
पावसाळ्यात दमटपणा आणि घाणीमुळे झुरळांची संख्या वाढते. घरामध्ये स्वयंपाकघर, स्नानगृहे या ठिकाणी झुरळे दिसतात. घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही ५ सोपे उपाय करू शकता.
घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी घर कोरडे आणि स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे म्हणजेच झुरळांची समस्या दूर होईल. रात्री जेवलेली खरकटी भांडी स्वच्छ धुवून ठेवा. अन्नपदार्थ हवाबंद डब्यात ठेवा.
बेकिंग सोडा आणि साखरेचा वापर करून तुम्ही घरातील झुरळांना पळवून लावू शकता. एका भांड्यामध्ये बेकिंग सोडा आणि साखर मिक्स करून ते पाणी झुरळ असणाऱ्या ठिकाणी शिंपडा.
कडुलिंब हा झुरळांवर घरगुती प्रभावी उपाय मानला जातो. पाण्यात कडुलिंबाचे तेल मिक्स करून त्याचा फवारा तुम्ही झुरळ असणाऱ्या ठिकाणी मारा .
बाजारात मिळणारी बोरिक पावडर तुम्ही झुरळांसाठी वापरू शकता. बोरीक पावडरमध्ये गव्हाचे पीठ आणि मैदा मिक्स करून त्याचे लहान लहान गोळे बनवा. झुरळ असणाऱ्या ठिकाणी हे गोळे ठेवा. हे झुरळांनी खाल्ल्याने झुरळे पळून जातील.
व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, सिंक, बाथरुमचे कोपरे आणि ड्रेनेज होलच्या आसपास हा स्प्रे मारा. यामुळे झुरळे पुन्हा फिरकणार नाहीत.