Shreya Maskar
धान्य साठवून ठेवण्याआधी ते सर्वप्रथम उन्हात किंवा पंख्याखाली वाळवा.
धान्यात किंचितही ओलसरपणा राहू देऊ नका नाहीतर किड लागते.
धान्य भरण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करा. म्हणजे दमट हवा धान्याला लागणार नाही.
धान्याचे डबे कायम स्वच्छ धुवून कोरडे करून वापरावे.
धान्याचे डबे नेहमी कपाटात उंचावर ठेवा. जमिनीवर ठेवल्याने थंड हवा लागते.
धान्याला किड लागू नये म्हणून त्यात लसूण , कडुनिंबाचा पाला, लवंग, सुकी लाल मिरची यांपैकी कोणताही पदार्थ टाकू शकता.
धान्य साठवताना जुने आणि नवे धान्य एकत्र करू नये.
धान्य ज्या ठिकाणी ठेवणार आहात ती जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा.