Shreya Maskar
तज्ज्ञांच्या मते, दह्याला सुटलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दह्याला सुटलेल्या पाण्यात जीवनसत्व, प्रोटीन असते. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
दह्याच्या पाण्यातील प्रोटीन वजन कमी करण्यास आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करते.
तसेच पचनक्रिया सुधारते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.
तुम्ही दह्याच्या पाण्याचा वापर कणिक मळण्यासाठी करा. जेणेकरून पोळ्या मऊ होतील.
भाजी शिजवताना दह्याला सुटलेले पाणी टाका. भाजीची चव आणखी वाढेल.
सूपमध्ये देखील दह्याचे पाणी मिक्स करून प्या. शरीराला चांगले पोषण मिळेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.