Manasvi Choudhary
मे महिन्याचा उन्हाळा सुरू आहे. कडाक्याच्या उन्हाळ्या शरीरातून घाम येणे ही समस्या सामान्य आहे.
शरीरातून घाम आल्याने घामोळ्या, त्वचेवर खाज सुटणे, अंगाची आगाआग होणे या समस्या होतात. घामामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.
उन्हाळामुळे शरीरातील घाम साचण्याचे पोअर्स बंद होतात तेव्हा त्वचेवर लहान लहान पुरळ येतात ज्याला घामोळ्या म्हणतात. यामुळे त्वचेची आगाआग होते.
यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टपेक्षा तुम्ही घरगुती ५ उपायांनी यावर सुटका मिळवू शकता.
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे त्वचेला संसर्गपासून रोखता येते. घामोळ्या झालेल्या ठिकाणी तुम्ही कोरफडचा रस लावल्याने फायदा होईल.
मुलतानी माती तेल आणि घाम शोषून घेते. तुम्ही घामोळ्या आलेल्या जागी मुलतानी माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
एका सुती कापडामध्ये बर्फ घेऊन ते घामोळ्या आलेल्या जागी लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. त्वचेची आगाआग होत नाही.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून ती घामोळ्या आलेल्या त्वचेवर लावा यामुळे तुम्हाला कोणताही इन््फेक्शन होणार नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.