Shreya Maskar
मिरची कापल्यानंतर हाताला जळजळ सुटते, हाताची आग होते. हाताला वेदना होऊ नये म्हणून महत्त्वाचे उपाय जाणून घेऊयात.
मिरची कापल्यानंतर हातांची जळजळ होत असेल तर चपातीचे पीठ मळा.
पीठ आणि पाण्यामुळे हाताची जळजळ थांबते.
मिरची कापल्यानंतर जळजळणाऱ्या हातांना एलोवेरा जेल लावा.
तुम्ही हाताला थंड नारळाचे तेल देखील लावू शकता. ज्यामुळे हात मऊ होतात.
हातांची आग जास्तच होत असेल तर हाताला थंड दही चोळा.
तुम्ही मिरची कापताना हातात हॅण्ड ग्लोव्हज घाला. म्हणजे हाताला वेदना होणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.