Manasvi Choudhary
मुंबईपासून जवळ असलेले मुरबाड हे प्रसिद्ध ठिकाण आहे. मुरबाडमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटक भेट देतात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही फार दूर नाही तर जवळपासच्या ठिकाणांना भेट देऊ शकता ते ठिकाण कोणते हे या वेबस्टोरातून जाणून घेऊया.
गोरखगड हा मुरबाड तालुक्यामधील प्रसिद्ध किल्ला आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माळशेज घाट हा मुरबाड तालुक्यातील प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोणत्याही ऋतूत स्वर्गसुखाचा आनंद मिळतो.
मुरबाडमधील रामपूर- सोनकावळे गावाजवळ गणेश लेणी परिसरात श्री गणेशाचे मंदिर आहे. अध्यात्मिक सुख अनुभवण्यासाठी या ठिकाणी भेट द्या.
नाणेघाट हे ऐतिहासिक ठिकाण आहे. ट्रेकिंगसाठी या ठिकाणी पर्यटक भेट देतात. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही या ठिकाणी सांयकाळच्या वेळी भेट देऊ शकता. शांत आणि गार वाटते.
मुरबाडमधील बारवी धरण हे पर्यटकांसाठी आकर्षण आहे. शांत, निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.