Manasvi Choudhary
आजकाल वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिलवर चालणे सोपे झाले आहे. जिम जाणाऱ्यासाठी तर हा एक सोपा व्यायाम झाला आहे. फिट राहण्यासाठी ट्रेडमिलवर चालणे फायदेशीर आहे.
पण तुम्हालाही माहित आहे का? दररोज किती तास ट्रेडमिलवर चालल्याने वजन कमी होते?
जर तुम्ही २ ते ३ दिवसापूर्वी ट्रेडमिलवर चालायला सुरूवात केली असेल तर २० ते ३० मिनिटे चालणे योग्य असेल.
आठवडाभर नियमितपणे चालल्याने शरीराची हालचाल होते, शरीर सक्रिय होण्यास सुरूवात होते. शरीराला सवय झाल्यावर १०-१५ दिवसांनी वेळ ४०-६० मिनिटांपर्यंत वाढवावी.
साधारणपणे आठवड्यापेक्षा जास्त म्हणजे १० ते १५ दिवस सतत ट्रेडमिलवर चालत असल्यास तुम्ही वेग वाढवू शकता.
नियमितपणे ४० ते ६० मिनिटे चालल्याने शरीर अधिक कॅलरीज बर्न करते यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.
ट्रेडमिलवर नुसरते चालणे महत्वाचे नाही तर तुमचा वेग देखील महत्वाचा आहे. सतत एकाच वेगाने चालण्यापेक्षा मध्येच वेग वाढवणे आणि पुन्हा कमी करणे अधिक प्रभावी ठरते.
वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किमान ५ दिवस ट्रेडमिलवर चालणे आवश्यक आहे
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.