Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला कांदापोहे आणि उपमा खाऊन तुम्ही कंटाळलात असाल तर शेवयाचा उपमा ही रेसिपी ट्राय करा.
लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना शेवयाचा उपमा खायला आवडेल. चवदार आणि पौष्टिक नाश्ता म्हणून तुम्ही सकाळी शेवयाचा उपमा बनवू शकता. अत्यंत सोपी रेसिपी आहे.
शेवयाचा उपमा बनवण्यासाठी मोठ्या शेवया, कांदा, शेंगदाने, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, हळद, मसाला, लिंबाचा रस, तेल, मीठ हे साहित्य एकत्र घ्या.
सर्वातआधी गॅसवर एका कढईमध्ये थोड्याशा तेलात शेवया फ्राय करा. शेवया भाजल्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढून घ्या.
पुन्हा याच कढईत तुम्ही फोडणी तयारी करा. गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची परतून घ्या.
या मिश्रणात बारीक कापलेला कांदा परतून घ्या. नंतर यात आलं किसून घाला. मिश्रणात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाजर, मटार बारीक करून घालू शकता.
भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर शेंगदाणे घालून परतून घ्या. नंतर या मिश्रणात मसाला, हळद, आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.
भाजलेल्या शेवया मिक्स केल्यानंतर संपूर्ण मिश्रण एकजीव करा. शेवयांमध्ये थोडेसे गरम पाणी मिक्स करून शेवया शिजवून घ्या.
कढईवर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या. शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.