Manasvi Choudhary
उंच दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे.
नियमितपणे योगा प्रकार केल्याने नैसर्गिकरित्या शारीरिक उंची वाढवण्यास मदत होते.
कोणते ५ योगासने केल्याने तुमच्या उंचीवर परिणाम होतो, हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
स्ट्रेचिंग केल्याने शरीर ताण येतो. पाठीचा कणा ताठ होतो यामुळे उंची वाढवण्यासाठी नियमितपणे सकाळी स्ट्रेचिंग करा.
कोब्रा स्ट्र्चे या योगासनामुळे पाठीचा कणा ताठ होतो. पाठीचे स्नायू मजबूत होतात. कोब्रा स्ट्रेच या स्थितीत १५ते २० सेकंद राहा तुम्हाला फरक दिसेल.
त्रिकोणी मुद्रा आणि त्याची वेगवेगळी रूपे केल्याने शरीराला ताण येतो यामुळे स्नायू, नसा ताणल्या जातात यामुळे उंची वाढण्यास मदत होते.
पोहणे हा व्यायामाचा एक प्रकार आहे. पोहल्याने संपूर्ण शरीरावर ताण येतो यामुळे शरीर लवचिक होते.
वीरभद्रासन हा योगा प्रकार केल्याने शरीर ताणले जाते. या योगासनामुळे हात, खांदे, मांड्या आणि पाठ मजबूत होते. नियमितपणे हा योगप्रकार केल्याने शरीर लवचिक होते. उंची वाढण्यास मदत होते.
वरील सर्व योगासनाचे प्रकार नियमितपणे केल्याने तुम्हाला चांगला परिणाम दिसेल.