ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऊटी हे तमिळनाडूमधील सुंदर शहर आहे. हे हिल स्टेशन ब्रिटिशांनी स्थापन केले होते. येथील चहाचे मळे आणि पर्वत पाहण्यासारखे आहेत.
ऊटीला फिरण्याकरिता तुम्ही सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान जाऊ शकता. येथे जाण्याकरिता तुम्ही ट्रेन किंवा फ्लाइटने प्रवास करु शकता.
मसुरी हे उत्तराखंड राज्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, ज्याला 'हिल्सची राणी' म्हणूनही ओळखले जाते. येथे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत नक्कीचं जा.
मसूरी हे ब्रिटिश आर्किटेक्चर, धबधबे आणि नद्यांसाठी फेमस आहे. येथील कैम्प्टी फॉल्स धबधबा बघायला विसरु नका.
खुपदा कपल हनीमूनकरिता शिमला हे ठिकाण निवडतात. हिमाचल प्रदेशात वसलेले शिमला हे शहर अत्यंत सुंदर आहे. येथे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत फिरु शकता.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. महाबळेश्वरला एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट देखील मानले जाते.
महाबळेश्वरमध्ये, स्टॉबेरीची शेती केली जाते. येथे तुम्हाला सर्वत्र ठिकाणी स्टॉबेरी पाहण्यास मिळेल. तसेच इतर अॅक्टिव्हिटीसुध्दा करायला मिळतील. तसेच तुम्हाला डोंगरांवर आणि स्ट्रॉबेरीच्या शेतांवर ढग फिरताना दिसतील.
जोडीदारासह पश्चिम बंगालमधील सुंदर शहर दार्जिलिंगला एकदा नक्की भेट द्या. येथे तुम्हाला आकर्षक चहाचे मळे बघायला मिळतील.
दार्जिलिंग हे शहर टॉय ट्रेनकरिता अत्यंत फेमस आहे. येथे टॉय ट्रेनने तुम्ही अनेक जागा फिरु शकता.