Siddhi Hande
भारत हा निसर्गाने नटलेला देश आह.भारतातील हिल स्टेशन हे खूप सुंदर आहे.
तुम्ही भारतातील या हिल स्टेशनला एकदा तरी भेट द्यायला हवी. निसर्ग अन् शांतता या दोघांचाही अनुभव तुम्हाला घेता येणार आहे.
कसोल हे खूप सुंदर ठिकाण आहे. पार्वती नदीच्या बाजूला असलेल्या या हिल स्टेशनचे सौंदर्य अलौकिक आहे.
या हिल स्टेशनवरुन समोर बघितले तर उंच बर्फाच्छादित डोंगर दिसतात. छान घनदाट जंगल पाहायला मिळतात.
कौसानी हे हिमालयातील शिखरांच्या विहंगम दृश्यासाठी ओळखले जाते. येथून तुम्ही बर्फाच्छातदित डोंगर पाहू शकतात.
कौसानी येथे जुनी मंदिरे, आश्रम आहेत. ज्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
गुलमर्ग हे हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. येथील रंगीबेरंगी फुले आणि बर्फाच्छादित प्रदेश पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे.
हिल स्टेशनची राणी म्हणून ऊटीला ओळखले जाते. निलगिरी टेकड्यांमध्ये ऊटी वसलेले आहे.
ऊटी हे हिरवागार निसर्ग आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. ऊटीमध्ये खूप जास्त चहाचे मळे आहेत.
ईशान्येकडील पर्वतांमध्ये तवांग हे हिल स्टेशन आहे. येथे अनेक मंदिरे आहे. बर्फाने वेढलेल्या या हिल स्टेशनमधील मंदिरे शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव देतात.