Mumbai : उंचावरून कोसळणारे मुंबईजवळील ५ पांढरे शुभ्र धबधबे, 'ही' सुंदर ठिकाणे खूपच कमी लोकांना माहितेय

Shreya Maskar

बेडगाव धबधबा

बेडगाव धबधब्याला 'सीक्रेट प्लेस वॉटरफॉल' म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण नैसर्गिक दगडी कमानीचा पूल, निसर्गरम्य कुंडल आणि रोमांचक 'क्लिफ जंपिंग'साठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ताम्हिणी घाटाजवळ बेडगाव धबधबा वसलेला आहे.

Bedgaon Falls | google

वैतरणा धबधबा

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये इगतपुरी जवळ असलेला वैतरणा धबधबा वर्षभर वाहतो. धबधब्याला वैतरणा धरणातून नियंत्रित पद्धतीने सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे सततचा प्रवाह मिळतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या कडक दिवसांतही हा धबधबा जोरदारपणे वाहत असतो.

Vaitrana Falls | google

भागीरथ धबधबा

भागीरथ धबधब्याला वांगणी धबधबा असेही म्हणतात. हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वांगणीजवळील बेडीसगाव येथे असलेला ४५ फूट उंचीचा आणि निसर्गाच्या कुशीत लपलेला धबधबा आहे.

Bhagirath Falls | google

डबडबा धबधबा

डबडबा धबधब्याला 'दाभोसा धबधबा' म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील जव्हार येथील ३०० फूट उंचीचा एक नेत्रदीपक धबधबा आहे. हा धबधबा त्याच्या प्रचंड उंचीसाठी, सभोवतालच्या घनदाट हिरव्यागार जंगलासाठी प्रसिद्ध आहे.

Dadbaba Falls | google

काळू धबधबा

काळू धबधबा हा महाराष्ट्रातील माळशेज घाट परिसरातील सर्वात उंच आणि मोठा धबधबा म्हणून ओळखला जातो. हा धबधबा सुमारे १,२०० फूट इतक्या प्रचंड उंचीवरून खाली कोसळतो.

Kalu Waterfall | google

काकडवाल धबधबा

काकडवाल धबधबा हे महाराष्ट्रातील कल्याणजवळील गोठाणीपाडा गावात आहे. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी खूपच खास आहे. वीकेंडला येथे फिरण्याचा प्लान करा.

Kakadwal Falls | google

काळमांडवी धबधबा

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हारजवळ असलेला काळमांडवी धबधबा अतिशय सुंदर आहे. गडद हिरव्या रंगाचे पाणी असलेले खोल डोह, खडकाळ, वनराईने नटलेल्या वाटांमुळे साहसी पर्यटकांना एक रोमांचक अनुभव देतो.

Kalmandvi Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : ना माथेरान ना लोणावळा, रिमझिम पावसात फिरा मुंबई-पुण्याजवळील 'ही' १० स्वर्गाहून सुंदर ठिकाणे

Mumbai-Pune | saam tv
येथे क्लिक करा...