Shreya Maskar
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या समृद्ध मराठा वारशासाठी ओळखले जाते. मे महिन्याच्या सुट्टीत येथे नक्की भेट द्या.
पन्हाळा किल्ल्याला पन्हाळगड देखील म्हणतात. पन्हाळा दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला आहे. हा कोल्हापूरपासून २० किमी अंतरावर आहे. 'पावनखिंडीच्या लढाई'साठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.
भुदरगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी (भुदरगड तालुका) जवळ वसलेला एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याची निर्मिती शिलाहार घराण्यातील राजा भोज (दुसरा) याने केली होती.
कोल्हापूर-सिंधुदुर्ग सीमेवर वसलेला रांगणा किल्ला (प्रसिद्धगड) हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक दुर्गम आणि ऐतिहासिक किल्ला आहे. घनदाट जंगलात किल्ला आहे.
विशाळगड किल्ला कोल्हापूर शहरापासून वायव्येस सुमारे ७६ ते ८० किमी अंतरावर, शाहूवाडी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगेत आणि कोकणच्या सीमेवर वसलेला आहे. येथे शिवरायांनी मोठा इतिहास घडवला.
कलानिधीगड किल्ला (किंवा काळानंदीगड) कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात स्थित आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
गंधर्वगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात, वळकुळी गावाजवळ स्थित एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३०७८ फूट उंचीवर आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.