Oversleeping Side Effects : सावधान! उशीरापर्यंत झोपणे टाळा, आरोग्याचे या ५ समस्यांपासून संरक्षण करा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धावपळीचे जीवन

आजकालच्या धावपळीच्या जगात झोपण्याचे चक्र बिघडले आहे. याचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसतो. मात्र, जास्त वेळ झोपल्याने आरोग्यासंबंधित समस्या भेडसावतात, त्यामुळे झोपेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Fast-paced life | Yandex

झोपेचे वेळापत्रक

आपल्या उत्तम जीवनशैलीसाठी रोज ६ तासाची झोप घेणे गरजेचे आहे. पण हीच झोप ८-९ तासांची होत असल्यास आजारांना आमंत्रण देते.

Controlling Sleep | Yandex

आजारांना आमंत्रण देते

जास्तकाळ झोप घेतल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य तर बिघडवते. त्याचसोबत अनेक आजारांची सुरुवात होते. तर मग जाणून घेऊयात सकाळी उशीरापर्यंत झोपल्यामुळे आरोग्याला कोणत्या समस्या होतात.

Invites Illnesses | Yandex

मानसिक आरोग्याचे नुकसान

सकाळी उशीरापर्यंत झोपल्यामुळे तुम्हाला नैराश्य, चिडचिड, मूड स्विंग या समस्यांना सामोरे जावे लागते.

Loss of mental health | Yandex

लठ्ठपणा येतो

उशीरापर्यंत झोपल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म कमी होते. ज्यामुळे शरीरातील फॅट वाढते, परिणामी हळूहळू वजन वाढू लागते.

Obesity occurs | Yandex

पचनक्रिया बिघडते

सकाळी उशीरापर्यंत झोपल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता वाढते.

Digestive Disorders | Yandex

ब्लड प्रेशरचा त्रास

उशीरापर्यंत झोपल्यामुळे शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. योग्य प्रमाणात ऊन मिळत नाही, त्यामुळे हार्मोनल इनबॅलेन्स होतो. यातूनच लोक ब्लड प्रेशरच्या त्रासाची शिकार होतात.

Blood pressure | Yandex

हृदयाचे आरोग्य धोक्यात

जास्त वेळ झोपल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

Heart health at risk | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: गरोदरपणात प्रवास करताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

Pregnancy Travel Tips | Yandex