Shreya Maskar
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर हे शहर वसलेले आहे. राजापूर अर्जुन आणि गोडी नद्यांच्या संगमावर आहे.
महाराष्ट्रातील राजापूर किल्ला अर्जुन नदीच्या काठावर वसलेला आहे. याला 'ब्रिटिश वेअरहाऊस फोर्ट' म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या शतकात ब्रिटिशांनी आपल्या व्यापारी वखारीच्या संरक्षणासाठी बुरुज आणि खंदकासह हा किल्ला बांधला होता.
राजापूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर यशवंतगड किल्ला वसलेला आहे. हा ऐतिहासिक सागरी किल्ला थेट हल्ल्यांपासून संरक्षणासाठी १५ फूट खोल खंदकाने सुरक्षित केला आहे.
कोकण किनारपट्टीवरील सर्वात मजबूत आणि जुन्या सागरी किल्ल्यांपैकी एक विजयदुर्ग किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा विस्तार केला होता. तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेल्या या किल्ल्यात २० फूट खोल खंदक आणि पाण्याखालील अद्वितीय भिंती आहेत.
समुद्राकडे तोंड असलेल्या कड्यावर वसलेला आंबोलगड किल्ला लहान आणि चढण्यास तुलनेने सोपा असा सागरी किल्ला आहे. हा प्राचीन मुसाकाजी बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता.
१८ व्या शतकातील पेशवे काळात बांधलेला पूर्णगड किल्ला लहान आणि सुस्थितीत असलेला टेहळणी बुरूज , मुचकंडी नदीच्या मुखाशी असलेल्या खडकाळ भूभागावर स्थित आहे.
राजापूरच्या दक्षिणेस सुमारे ५० किमी अंतरावरावर देवगड किल्ला वसलेला आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा १८ व्या शतकातील मराठाकालीन किल्ला समुद्रसपाटीपासून २५० फूट उंचीवर वसलेला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.