Manasvi Choudhary
कमी वेळेत लवकर होणाऱ्या चविष्ट आणि पौष्टिक भाजी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
बटाटा हा सर्वांनाच आवडतो बटाट्याची हळद, मिरची टाकून केलेली पिवळी भाजी चविष्ट लागते.
कोबी ही भाजी देखील तुम्ही झटपट बनवू शकता, कोबी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
बेसनापासून तयार केलेलं पिठलं ही झटपट होणारी रेसिपी आहे. भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही पिठलं सर्व्ह करू शकता.
कांदा, लसूण टाकून केलेली मेथीची भाजी चवीष्ट लागते. यामध्ये तुम्ही शेंगदाणे कूट देखील मिक्स करू शकता.
भेंडीचे मध्यम तुकडे करा. तेलात जिरे, ओवा आणि कांदा परतून. भेंडी घालून त्यात धणे-जिरे पूड, हळद आणि तिखट घालून परतून घ्या.भेडीची भाजी तयार होईल.