Shreya Maskar
मरीन ड्राईव्हवरून गजबजलेल्या मुंबईचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
गरमागरम चहासोबत जोडीदारासोबत गप्पांची मैफील रंगवा.
वरळी सी फेस वरून वांद्रे-वरळी सी लिंकचा अद्भुत नजारा अनुभवता येतो.
वरळी सी फेस वरून अथांग समुद्राचे दर्शन होते. जेथे मावळणाऱ्या सूर्यासोबत तुम्ही फोटोशूट करू शकता.
पावसात जोडीदारासोबत एक निवांत संध्याकाळ घालवण्यासाठी पवई तलाव बेस्ट ठिकाण आहे.
पावसाळ्यातील पवई तलावाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
वर्सोवा बीचवर तुम्ही बोटिंग आणि घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.
वर्सोवा बीच मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा शांत किनारा आहे.