Manasvi Choudhary
मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याची किंमत लाखाच्या घरात गेली आहे. भारतात सोनं घालण्याची संख्या मोठी आहे. अनेकजण सोनं घालणं प्रतिष्ठा मानतात.
मात्र जगामध्ये काही देशांमध्ये भारतापेक्षा स्वस्त सोनं मिळते. तर हे देश कोणते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
सर्वात स्वस्त सोनं मिळण्याचं प्रसिद्ध ठिकाण म्हणून दुबईची ओळख आहे. दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही त्यामुळेच अन्य देशांपेक्षा दुबईमध्ये सोनं स्वस्त असते.
दुबईमध्ये सोन्याची किंमत 67,686 प्रति १० ग्रॅम आहे असे म्हटले जाते. दुबईतील सोने अतिशय उच्च दर्जाचे आहे.दुबईच्या देहरा सिटी सेंटरला गोल्डन हब म्हटले जाते तिथे अनेक सोन्याची दुकाने आहेत. जिथे भारतीय सेलिब्रिटी आणि विविध लोक सोने खरेदी करतात.
सोन्याच्या उत्पादनात थायलंड दुसऱ्या क्रमाकांवर आहे. चायनाटाउन हे सोन्याच्या दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. बॅकॉकमध्ये सोन्याचे दागिने खूप कमी किंमतीत मिळतात.
इंडोनेशियामध्ये, २४ कॅरेट सोन्यी किंमत 1,330,266 इंडोनेशिया रूपिया किंवा प्रति १० ग्रॅम ७१,८८० रूपये आहे. तेच भारतात १० ग्रॅम सोने ७७,००० रूपये आहे.
कंबोडिया हे देखील सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोन्याचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. येथे १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,८८० आहे.
स्वित्झर्लंड हे सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाइन आणि परवडणाऱ्या किंमतींसाठी प्रसिद्ध आहे. सोन्याची घड्याळे येथे लोकप्रिय आहेत.