Shreya Maskar
उन्हाळ्यात वीकेंडला लांब जायचे नसेल तर तुम्ही मुंबईतही छान वन डे पिकनिक प्लान करू शकता. बोरीवली येथे वन डे पिकनिकची सुंदर ठिकाणे आहेत.
जंगल ट्रेकिंग, सायकलिंग, बोटिंग, मिनी ट्रेन राईड यांचा आनंद घ्यायचा असेल तर संजय गांधी नॅशनल पार्कला उत्तम ठिकाण आहे.
तुम्हाला नॅशनल पार्कला हिरवागार निसर्ग पाहायला मिळेल. ज्यामुळे थंड वातावरण अनुभवता येईल. येथे जवळून प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. तसेच येथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे गार्डनर देखील आहे.
कान्हेरी लेणी ही 2000 वर्षांहून अधिक जुनी आहे. कान्हेरी लेणींमध्ये 100 हून अधिक प्राचीन बौद्ध लेण्यांचा समूह आहे. येथे सुंदर कोरीव काम पाहायला मिळते.
कान्हेरी लेणी पर्यंत तुम्ही एक छोटा ट्रेक करून देखील जाऊ शकता. पावसाळ्यात येथे छोटे धबधबे तयार होतात, हे सौंदर्य स्वर्गाहून सुंदर असते.
गोराई बीच हा बोरीवलीजवळील सुंदर किनारा आहे. येथे जाताना बोटीने प्रवास होतो. सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. येथे संध्याकाळी फिरायला नक्की जा.
ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे ध्यान आणि शांततेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे छोटी बाग देखील आहे. लहान मुलांना येथे खूप चांगली माहिती मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.