Manasvi Choudhary
रेडी टू वेअर साडीची महिलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. खासकरून तरूण मुली अश्या साड्या अधिक वापरतात.
ज्यांना साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी 'प्लेट्स' पाडलेल्या तयार साड्या सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत ज्याला रेडी टू वेअर साडी असे म्हणतात.
रेडी टू वेअर साडीचे अनेक पॅटर्न आहेत जे तुम्ही पार्टी, लग्न संगीत सोहळ्यासाठी निवडू शकता.
रफल स्टाईल साडीला खाली २-३ लेअर्समध्ये 'झालर' किंवा रफल्स असतात. ही साडी नेसायला अतिशय सोपी असते आणि दिसायला खूप मॉडर्न दिसते.
धोती स्टाईल रेडी साडी धोतीसारखी आधीच स्टिच केलेली असते. तुम्हाला फक्त ती पँटसारखी घालायची असते. इंडो-वेस्टर्न लूकसाठी हे डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंग आहे.
या साडीसोबत मॅचिंग एम्ब्रॉयडरी केलेला बेल्ट येतो. साडीच्या निऱ्या आधीच शिवलेल्या असल्याने त्या सुटण्याची भीती नसते आणि बेल्टमुळे कंबर सुबक दिसते.
ज्यांना चालताना साडीत अडखळायला होते, त्यांच्यासाठी पँट किंवा लेगिंग्स साडी पँटवर जोडलेली असते. डान्स किंवा लग्नातील गडबडीच्या कामात ही साडी अतिशय सोयीस्कर ठरते.
रेडी टू वेअर साडीमध्ये निऱ्या लहान-मोठ्या होण्याची किंवा सुटण्याची चिंता नसते. अत्यंत कमी वेळेत सेकंदामध्ये ही साडी नेसून होते.