Manasvi Choudhary
चंद्रकोर टिकली महाराष्ट्राची शान आहे. पारंपारिक लूक म्हणून चंद्रकोर टिकली लावणयाची जुनी परंपरा आहे.
सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी पारंपारिक वेशभूषा केल्यानंतर खास महिला व पुरूष चंद्रकोर टिकली लावतात.
चंद्रकोर टिकलीचे लेटेस्ट डिझाईन्स आहेत त्या तुम्ही मॅचिंग लावू शकता.
मॅट फिनिश'चा ट्रेंड असल्यामुळे वेलवेटच्या टिकल्या खूप लोकप्रिय आहेत. लाल वेलवेट चंद्रकोर टिकली तुम्ही लावू शकता.
'हेवी' किंवा 'ग्लॅमरस' लूक हवा असेल तर तुम्ही डायमंड चंद्रकोर टिकली निवडू शकता. चंद्रकोरीच्या मध्यभागी किंवा टोकावर एक छोटा पांढरा खडा किंवा कुंदन असतो नवरी लूकसाठी तुम्ही या टिकल्याची निवड करू शकता.
लहान आकाराची ही चंद्रकोर टिकली तरूणींमध्ये प्रसिद्ध आहे. खास जीन्स-कुर्तीवर किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवरही लूक 'क्लासी' दिसते.
सोन्याच्या दागिन्यांसोबत मॅच होण्यासाठी सोन्याच्या रंगाची किंवा मेटॅलिक शेड असलेली चंद्रकोर सध्या लग्नसराईत खूप पाहायला मिळत आहे.