Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील कोकण हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अनेक राज्यातून लोक खास कोकणात भेट देतात.
कोकण म्हणजे अथांग पसरलेला समुद्रकिनारा, वाऱ्याने डोलणारी नारळी-पोफळीची झाडं, हापूस आंब्याच्या बागा, फणस आणि काजूचे घोस.
उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कोणत्याही ऋतूत तुम्ही कोकणात भेट देऊ शकता. तुम्हालादेखील कोकणात फिरण्यासाठी जायचं असेल तर तुम्ही खालील 5 ठिकाणांना नक्की भेट द्या.
कोकणाच्या रत्नागिरीमध्ये गणपतीचं मोठं मंदिर आहे. नवसाला पावणाऱ्या या मंदिरात भेट दिल्यानंतर पर्यटकांना प्रसन्न वाटते.
रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा किल्ला हा ऐतिहासिक वारसा जपतो आहे. हा किल्ला समुद्राच्या मध्यस्थानी आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी बोटिंगची व्यवस्था आहे.
दापोलीला 'कोकणचे महाबळेश्वर' अशी ओळख आहे. येथील थंडावा मनाला मोहून टाकतो. निसर्गाच्या सानिध्यात खास वेळ घालवण्यासाठी येथे पर्यटक जातात.
नारळ- पोफळीच्या बागा आणि अत्यंत स्वच्छ समुद्रकिनारा अशी गुहागरची ओळख आहे. अस्सल कोकणी संस्कृती अनुभवायची असेल तर तुम्ही गुहागरला नक्की भेट द्या.
कोकणाचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती जपणारे हे ठिकाण आहे. हिरव्या गार निसर्गसौंदर्यासाठी आणि डोंगराळ परिसरामध्ये येथे येथे छोटी छोटी गावे आहेत.