नाश्त्याचा टेन्शन मिटलं! फक्त दोन बटाटे वापरून बनवा कुरकुरीत डोसा; चव चाखून सगळे विचारतील रेसिपी!

Manasvi Choudhary

डोसा

डोसा हा नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आहे. अनेक डाळीपांसून बनवणारा पदार्थ लहानांपासून मोठे आवडीने खातात.

Idli-Dosa

युनिक डोसा रेसिपी

मात्र नेहमीचा तोच तोच डोसा खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर तुम्ही आज ही युनिक डोसा रेसिपी नक्की ट्राय करा.

Dosa Recipe

बटाटा डोसा

तुम्ही बटाटा वडा खाल्ला असेल, पण तुम्ही कधी बटाटा डोसा खाल्ला आहे का? बटाटा डोसा घरी देखील तुम्ही बनवू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्याघरी बटाटा डोसा बनवा.

Potato Dosa Recipe

डोसा पीठ असे वापरा

मैदा, तांदळाचे पीठ आणि चण्याचे डाळीचे पीठ तुम्ही डोसा बनवण्यासाठी वापरायचे आहे.

dosa | yandex

बटाट्याचा बारीक किस करा

डोसामध्ये बटाटा किसून किंवा कुस्करून घालू शकता म्हणजे त्याची बारीक पेस्ट होईल.

Healthy Breakfast Recipe

चवीसाठी या गोष्टी मिक्स करा

चवीसाठी तुम्ही यामध्ये पालक, कोथिंबीर हळद आणि लाल मसाला याचा वापर करू शकता.

spices

पीठ बनवा

पीठ तयार करण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये तांदूळ, चणे याचे पीठ एकत्र करायचे आहे. यामध्ये पालक, कोथिंबीर आणि किसलेला बटाटा मिक्स करा. नंतर यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून संपूर्ण मिश्रण एकजीव करा. चवीसाठी यात हळद आणि मसाला मिक्स करा.

Healthy Breakfast Recipe

डोसा तयार करा

गॅसवर गरम तव्यामध्ये तेल घाला आणि मिश्रण तव्यावर पसरवून दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. साधारणपणे २ ते ३ सेकंदानंतर डोसाला पलटी करून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग होईपर्यंत फ्राय करा. अशाप्रकारे घरच्या घरी बटाटा डोसा तयार होईल.

Healthy Breakfast Recipe

NEXT: पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

येथे क्लिक करा...