Shreya Maskar
देवगड हापूस आंब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
देवगडला आल्यावर देवगड समुद्रकिनारा, कुणकेश्वर मंदिर, विजयदुर्ग किल्ला आणि तांबळडेग या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
देवगड समुद्रकिनारा जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.
कुणकेश्वर मंदिर हे देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले आहे.
कुणकेश्वर मंदिराला 'कोकणची काशी' म्हणून ओळखले जाते.
कुणकेश्वर मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
देवगडजवळ विजयदुर्ग किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
तांबळडेग गावाला गेल्यावर तुम्हाला हिरवीगार वनराई पाहायला मिळते.