Shreya Maskar
सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. भक्त देवीच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.
नवरात्रीत काही लोक नऊ दिवस उपवास करून देवीची मनोभावे पूजा करतात. वेगवेगळ्या मंदिरांना भेट देतात.
पुण्यातील प्रसिद्ध देवीची मंदिरे जाणून घेऊया. जेथे तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येईल.
पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती असलेले 'वैष्णोदेवी माता मंदिर'आहे
पुण्यात कोंढवा परिसरातील एका टेकडीवर आई माता मंदिर आहे.
'आई माता मंदिर' संगमरवरी बांधकामासाठी, सुंदर नक्षीकामासाठी आणि भव्य कमानीसाठी ओळखले जाते.
पुण्याच्या भवानी पेठेत एक प्रसिद्ध भवानी माता मंदिर आहे.
चतु:श्रुंगी माता मंदिर पुण्यात सेनापती बापट रोडवर आहे.