Saam Tv
हिमालयातील निसर्गरम्य वातावरणात बर्फाच्छादित डोंगर आणि गार वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही खालील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.
हिमाचल प्रदेशातील मनाली आणि रोहतांग पास येथे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात सुंदर हिमवृष्टी पाहायला मिळते.
काश्मीरमधील गुलमर्ग हे बर्फवृष्टीसाठी जगप्रसिद्ध ठिकाण आहे.येथील गंडोला राईड आणि केबल कारमधून दिसणारा बर्फाच्छादित नजराणा अत्यंत नयनरम्य असतो.
उत्तराखंडमधील औली हे भारतातील प्रमुख 'स्कीइंग डेस्टिनेशन'मानले जाते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये येथील पर्वतरांगांवर बर्फाची चादर पसरण्यास सुरुवात होते, ज्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे सर्वोत्तम ठिकाण ठरते.
उत्तर सिक्कीममधील लाचूंग आणि युमथांग व्हॅली या ठिकाणीही लवकर हिमवृष्टी पाहायला मिळते.
या काळात तापमान खूप कमी होत असल्यामुळे योग्य ते लोकरीचे आणि उबदार कपडे सोबत ठेवा.
प्रवासाला निघण्यापूर्वी त्या भागातील हवामान आणि रस्त्यांची माहिती नक्की घ्या.
वेळेआधीच हिमवृष्टी झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू शकते, त्यामुळे हॉटेल आणि प्रवासाचे बुकिंग आधीच करून ठेवा.
NEXT : महिलांसाठी 7 भन्नाट उखाणे; जे ऐकून सगळेच म्हणतील ‘वाह!’