Shreya Maskar
पावसाळ्यात ट्रेकिंग करायला अनेकांना आवडते, मात्र काही ठिकाणी हे धोक्याचे ठरते.
हरिश्चंद्रगड ट्रेकिंग करताना निसरडी वाट आहे, त्यामुळे ट्रेकिंग करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
जीवधन किल्ल्यावर ट्रेकिंग करताना खडतर वाट, चढाई, निसरडे रस्ते आणि चिखलयुक्त भाग हे मोठे अडथळे आहेत.
नाणेघाट खूप उंच असल्यामुळे पावसाळ्यात इथे ट्रेकिंग टाळा.
धुक्यामुळे रस्ता चुकण्याची आणि आपण हरवण्याची शक्यता वाढते.
रोहिडा किल्ला हा जोरदार वाऱ्याचा अनुभव येतो त्यामुळे तोल जाण्याचा धोका वाढतो.
ट्रेकिंगच्या वेळी अनेक ठिकाणी उंच कडे, खडक आणि दऱ्या असतात, जे पावसाळ्यात धोक्याचे ठरू शकते.
हरिश्चंद्रगड,रोहिडा किल्ला, नाणेघाट आणि जीवधन किल्ला येथे तुम्ही हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात भेट देऊ शकता.