Shreya Maskar
पावसाळ्यात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. कोणत्या भाजांचे सेवन करावे जाणून घेऊयात.
भेंडी पावसाळ्यात आवर्जून खा. यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते.
भेंडी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हृदयासंबंधी समस्या कमी करण्यास मदत करते.
पावसाळ्यात भोपळा पचायला हलका असून पोषणयुक्त आहे.
भोपळ्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
कारले खाल्ल्याने पावसाळ्यात शारीरिक ताकद वाढवते.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास कारले मदत करते.
पावसाळ्यात सर्व भाज्या गरम पाण्यात धुवून मगच त्याचा वापर करावा.