Shreya Maskar
एका बाऊलमध्ये मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिक्स करा.
चेहरा धुवून मुलतानी मातीची पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.
तेलकट त्वचेवर मुलतानी मातीचा फेसपॅक रामबाण उपाय आहे.
छोट्या बाऊलमध्ये बेसन, दही, हळद आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
तयार मिश्रणाचा हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा.
उन्हात काळवंडलेली त्वचा उजळेल.
तुम्ही कडुलिंबाची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावा.
यामुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होऊन त्वचा तजेलदार बनेल.