Shreya Maskar
पावसाळ्यात मका मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतो.
मक्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
मक्याच्या कणसाचे दोन्ही बाजूंनी दोन समान तुकडे करा.
आता मक्याच्या कणसाचे वरची रेषमधील दाणे अंगठ्याने पुढच्या बाजूला वाकवून पटापट काढून घ्या.
अशाप्रकारे एकेका ओळीतले दाणे सोलत जा.
तुम्ही सुरीच्या साहाय्याने देखील मक्याचे दाणे सोलू शकता.
सुरीच्या साहाय्याने मक्याचे दाणे सोलण्यासाठी कणसावरील दाणे चमच्याने किंवा सुरीने एका रेषेत काढा.
उकडून मक्याचे दाणे सहज आणि लवकर सोलता येतात.