Shreya Maskar
काही दिवसांवर होळी हा रंगांचा सण येऊन ठेपला आहे.
यंदा १४ मार्चला रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे.
होळीला आयुष्यात एकदा तरी मथुरा आणि वृंदावनला भेट द्या.
उत्तर प्रदेशातील श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरामध्ये होळीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.
मथुरा येथील द्वारकाधीश मंदिरात गुलालाने होळी साजरी करतात.
उत्तर प्रदेशातील वृंदावन या ठिकाणी होळीच्या रंगात रंगण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात फुलांची होळी खेळली जाते.
या दोन्ही ठिकाणी तुम्ही फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.