Shreya Maskar
एखाद्या नवीन ठिकाणी महिलांनो जात असाल तर तुमचे लाईव्ह लोकेशन जवळच्या व्यक्तीला पाठवून ठेवा.
ऑटो किंवा कॅबमध्ये चढण्यापूर्वी वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढा.
नवीन ठिकाणी जात असाल तर तुमच्या घरातील सदस्यांचा आणि पोलिसांचा नंबर स्पीड डायलवर ठेवा. म्हणजे तुम्हाला मदत मागता येईल.
महिलांनो कोणत्याही वाईट परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नका. हिंमतीने प्रसंगाला सामोरे जा.
स्वतःकडे सुरक्षेसाठी पेपर-स्प्रे न विसरता ठेवा.
तुम्हाला एखाद्या ठिकाणी असुरक्षित वाटले किंवा एखाद्या व्यक्तीवर संशय आला तर तिथेच आरडाओरडा करून पळून जाण्याचा प्रयत्न करा.
एखाद्याने तुमच्यावर अटॅक केला तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर बोटांनी अटॅक करा.
कितीही घाई असली तरी नवीन ठिकाणी जात असाल तर शॉर्टकट चुकूनही घेऊ नका.