Manasvi Choudhary
प्रत्येकाच्या घरांमध्ये सर्वात जास्त बनवला जाणारा नाश्ता. कांदा पोहे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
रव्याचा उपमा हा पचायला हलका आणि आरोग्यदायी असतो तो देखील तुम्ही नाश्त्याला बनवू शकता.
दिवसभर शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्ही भाजणीच्या पिठाचे थालीपीठ बनवू शकता. ही रेसिपी अत्यंत चवीष्ट लागते.
फक्त उपवासासाठीच नाही तर नाश्त्यासाठीही साबुदाणा खिचडी उत्तम आहे. भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणा कूट आणि जिरे-मिरचीच्या फोडणीत बटाट्याचे काप घालून परतून घेऊन खिचडी बनवा.
मूग डाळ आणि तांदूळ भिजवून त्याचे पीठ तयार करा. त्यात आलं-मिरची पेस्ट आणि मीठ घालून तव्यावर डोशासारखे मिश्र डाळीचे धिरडे तुम्ही बनवू शकता.
घरच्या घरी तुम्ही साऊथ इंडियन नाश्ता इडली मेदूवडा बनवू शकता.
उकडलेल्या बटाट्यात मसाले भरून गव्हाच्या पिठाच्या पारीत ते सारण भरा आणि तव्यावर तूप लावून भाजून बटाटा पराठा करू शकता.
अंडी खाणाऱ्यांसाठी हा सर्वात सोपा नाश्ता म्हणजे अंड्याच्या मिश्रणात कांदा-टोमॅटो-मिरची घालून ब्रेड त्यावर बुडवून तव्यावर फ्राय करा.
हॉटेलसारखा नाश्ता घरीच करण्यासाठी तांदूळ आणि डाळीचे आंबवलेले पीठ तव्यावर पसरून त्यात बटाट्याची भाजी भरा आणि कुरकुरीत होईपर्यंत शेका.