Shreya Maskar
धो धो पावसात शाळेची बॅग भिजू नये म्हणून बॅगला प्लास्टिक कव्हर लावा.
लहान मुलांना शाळेत जाताना लेदर बॅग देऊ नका.
लेदर बॅग पावसाळ्यात लवकर खराब होते.
पावसाच्या पाण्याने वही-पुस्तक भिजू नये म्हणून त्याना जाड प्लास्टिक कव्हर घाला.
तसेच बॅगमध्ये वही-पुस्तक पिशवीमध्ये ठेवा.
पावसाळ्यात बॅगमध्ये आवर्मजून जास्तीची पिशवी ठेवा. म्हणजे ओल्या वस्तू तुम्हाला त्यात ठेवता येतील.
लहान मुलांना छत्रींचे खूप आकर्षण असते पण त्यांना छत्री ऐवजी रेनकोट द्या.
पावसातून आल्यावर शाळेची बॅग न विसरता कोरडी करा आणि हवेत सुकवा.