Shreya Maskar
मुलींनो पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जात असाल आणि हॉस्टेलच्या शोधात असाल तर हॉस्टेलची निवड करताना या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या.
हॉस्टेलमध्ये तुम्ही ज्या मुलींसोबत रुम शेअर करणार असाल त्यांची सर्व माहिती काढून घ्या.
हॉस्टेलमध्ये मुले येऊ नये म्हणून मुलींनी आधीच नियम ठरवून घ्या.
विश्वास असलेल्या व्यक्तीलाच तुमचे फोटो आणि व्हिडीओ घ्यायला द्या.
तुम्हाला थोडा जरी कोणावर संशय आला तरी वेळेत सावध व्हा.
हॉस्टेलच्या कँपसमध्ये जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसतील तिथे एकट्याने फिरू नका.
हॉस्टेल निवडताना ग्रंथालय आणि क्रीडा संबंधित गोष्टी कँपसमध्ये असायला हव्यात याची खबरदारी घ्या.
गजबजलेल्या ठिकाणी हॉस्टेल घ्या. म्हणजे तुम्हाला एकटे वाटणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.