Saree Collection : 'या' ५ साड्या कधीच होत नाही आऊट ऑफ फॅशन; कायम मिळेल रॉयल लूक, पाहा डिझाइन्स

Shreya Maskar

आऊट ऑफ फॅशन

आजकाल बाजारात अनेक नवीन साड्या आल्या आहेत. पण अशा काही साड्यांच्या डिझाइन्स आहेत, ज्या कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाही. तशा पाच साड्या पाहूया.

Saree Collection | pinterest

मोराची डिझाइन असलेली साडी

मोर भारतीय कला आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. पैठणी आणि बनारसी साड्यांमध्ये मोराची नक्षी उठून दिसते. या नक्षीमुळे एक राजेशाही थाट येतो.

Paithani Saree Design | pinterest

फ्लावर प्रिंट साडी

फुलांची नक्षी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. फुलांची भरतकाम केलेली डिझाइन खूप छान दिसते. बनारसी, ऑर्गन्झा साड्या प्रत्येक सीझन आणि प्रत्येक प्रसंगी अप्रतिम दिसतात.

Floral Print Sarees | pinterest

बेल-बॉटम साडी

रेशमी किंवा सुती साड्यांवरील भरत कामाच्या नक्षीमुळे पारंपरिक अनुभव येतो. ही नक्षी सामान्यतः बनारसी आणि तांत साड्यांमध्ये पाहायला मिळते. बेल-बॉटम साडी दिसायला खूपच आकर्षक असते.

Bell-Bottom Sarees | pinterest

भौमितिक प्रिंट साडी

पारंपरिक ते आधुनिक साड्यांपर्यंत सर्वत्र त्रिकोणी, चौकोनी आणि नक्षीकाम दिसून येते. पटोला आणि बांधणी साड्यांमध्ये भौमितिक प्रिंट विशेषतः लोकप्रिय आहेत. त्यामुळे ही साडी तुमच्याकडे पाहिजेच.

Geometric Print Sarees | pinterest

भरतकाम, जरीकाम

गोटा पट्टी, जरी आणि ब्रोकेड काठांच्या साड्या लग्न समारंभ आणि सणांसाठी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. त्यांची चमकदार आणि राजेशाही छटा प्रत्येक स्त्रीला सुंदर बनवतात.

Zari Work saree | pinterest

ब्लाऊज डिझाइन्स

गोल्डन ब्लाऊज, ब्लॅक ब्लाऊज, व्हाइट (क्रीम) एम्ब्रॉयडरी ब्लाऊज, मरून सिल्क ब्लाऊज, प्रिंटेड ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच पाहिजे. हे सर्व साड्यांवर सुंदर दिसतात.

Blouse Designs | pinterest

वेस्टन-पारंपरिक लूक

वरील सर्व साड्या तुम्ही ऑफिस, लग्न समारंभ, पूजा या प्रसंगात घालू शकता. तसेच वेस्टन आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीने या साड्या स्टाइल करता येतात.

Saree Collection | pinterest

NEXT :  साडी अशी नेसा की सुटायचं टेन्शनच नाही, 'या' ५ स्टेप्स करा फॉलो

Saree Draping Tips | saam tv
येथे क्लिक करा...