Shreya Maskar
महिलांना साडी नेसायला खूप आवडते. मात्र साडी नेसल्यावर भरभर काम करायला काही महिलांना जमत नाही. ज्यामुळे त्यांचा खूप वेळ जातो. तसेच साडी सांभाळणे कठीण होते. महिलांना साडी सुटण्याची भीती वाटते.
साडीत तुम्हाला ही भरभर काम करायचे असेल तर सर्व प्रथम साडीत comfortable व्हा. यासाठी साडी नेसताना एक छोटा बदल करा. साडी पेटीकोट वर नेसली जाते. मात्र तुम्ही साडी जीन्सवर नेसा. जेणेकरून तुम्ही साडीत नीट चालाल.
जीन्सवर साडी नेसल्याने तुम्ही आरामात चालू शकता. पटापट कामे करू शकता. कारण जीन्स खूप comfortable असते. तसेच जीन्सवर साडी बांधल्याने तुम्ही स्लिम-ट्रीम दिसाल.
जीन्सवर साडी नेसणे हा एक इंडो-वेस्टन लूक देते. अशा साडीत पेटीकोटऐवजी जीन्स घातली जाते. साडीचा एक काठ जीन्समध्ये खोचून कमरेभोवती साडी छान गुंडाळली जाते.
तुम्ही यात नेहमीचे ब्लाउज घालण्यापेक्षा थोडे वेगळे म्हणून टी-शर्ट/क्रॉप टॉप परिधान करू शकता. एक क्लासी लूक येईल आणि तुम्हाला आरामदायी वाटेल. साडीच्या नेऱ्या जीन्समध्ये खोचा.
जीन्सवर साडी नेसण्यासाठी शिफॉन , जॉर्जेट , क्रेप, सुती, सिल्क या साड्या नेसाव्यात. या वजनाने खूप हलक्या असतात. यात आपण टेन्शन फ्री वावरू शकतो. नीट बसू शकतो.
साडीचे निऱ्या आणि पदर थोडा अरूंद काढा जेणेकरून जीन्सचा लूक व्यवस्थित दिसेल आणि लूक आणखी उठावदार दिसण्यासाठी छान कंबरपट्टा लावा.
तुम्ही सर्वात सोपी ट्रिक म्हणजे तुम्ही रेडी-टू-वेअर साडी परिधान करा. ही नेसतानाही त्रास होत नाही आणि सांभाळतानाही अडचणी येत नाही. तुम्ही यात आरामदायी काम करू शकता.