Shreya Maskar
गणपतीच्या दर्शनाला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गर्दी खूप असल्यामुळे स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या.
दर्शनासाठी रांगेत उभे असताना धक्काबुक्की करू नका.
दर्शनासाठी लांबच लांब रांगा असतात, त्यामुळे पाण्याची बॉटल आणि सुका खाऊ सोबत ठेवा.
सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जास्त वेळ लागतो. त्यामुळे शूज घाला म्हणजे पाय दुखणार नाही.
तुमच्यासोबत आजी-आजोबा , छोटे बाळ असेल तर त्यांची विशेष काळजी घ्या.
मोठ्या सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला वृद्धमंडळी आणि लहान मुलांना घेऊन जाणे टाळा.
तसेच गणपतीत गर्दीच्या ठिकाणी सोनं-चांदीचे दागिने घालून जाऊ नका. कारण चोरी होण्याची शक्यता असते.
सार्वजनिक गणपती दर्शनाला गुप्रमध्ये जा. एकट्याने फिरणे असुरक्षित आहे.