Shreya Maskar
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. भाविक लाडक्या गणपतीच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.
आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाईल. विसर्जन करताना काही गोष्टींची विशेष खबरदारी घ्या.
गणपतीचे विसर्जन करताना प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करा.
गणपतीचे विसर्जन करताना उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करणे टाळावे.
छोट्या गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे.
समुद्रावर विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळा म्हणजे धक्काबुक्की होणार नाही.
मूर्तीसोबत प्लास्टिक किंवा इतर टाकाऊ वस्तूंचे विसर्जन करू नये.
गणपती विसर्जनादरम्यान प्रदूषण टाळा आणि पर्यावरणाचे रक्षण करा.