Shreya Maskar
यंदा वटपौर्णिमा १० जूनला आली आहे.
वटपौर्णिमेला नवऱ्यासाठी खास पारंपरिक लूक करा.
काठापदराची साडी, पारंपरिक दागिने , सुंदर केशभूषा आणि मिनिमल मेकअपमध्ये तुमचे सौंदर्य खुलून येईल.
तुम्ही साडीमध्ये पैठणी, बनारसी आणि सिल्क साड्यांची निवड करू शकता.
आजकाल फ्लोरल प्रिंटेड साडीचा ट्रेंड देखील सुरू आहे.
केशभूषा करताना आवर्जून मोगऱ्याचा गजरा, वेणी आणि फुलं केसात माळा.
तुम्ही वटपौर्णिमेला खास हातावर मेहंदी देखील काढू शकता.
दागिन्यांमध्ये आवर्जून मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या आणि नथ घाला, ज्यामुळे तुमचे सौंदर्य खुलेल.