भारतातील प्रसिद्ध १० थंड हवेची ठिकाणं; जिथे गेल्यानंतर मिळेल थेट काश्मीरसारखा फिल, पाहा संपूर्ण लिस्ट

Manasvi Choudhary

भारतातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे

उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही भारतातील थंड हवेच्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Top 10 Coolest Places In India

मनाली

निसर्गरम्य दऱ्या, सोलांग व्हॅली आणि रोहतांग येथील बर्फाच्छादित डोंगर मनालीचे मुख्य आकर्षण आहेत. ट्रेकिंग आणि पॅराग्लाइडिंगसारख्या साहसी खेळांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Manali

शिमला

'हिल स्टेशन्सची राणी' म्हणून ओळखले जाणारे शिमला हे प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.

Shimla

लेह- लडाख

ज्यांना अथांग शांतता, निळेभोर तलाव आणि पर्वतरांगा मध्ये फिरायला आवडते त्यांनी लेह-लडाख या ठिकाणी भेट द्या. बाईकर्ससाठी हे ड्रीम डेस्टिनेशन आहे.

Ladakh

श्रीनगर

श्रीनगरचे सौंदर्य उन्हाळ्यात अधिकच खुलते. श्रीनगरमधील दाल लेकमध्ये शिकारा राईड आणि हाऊसबोटमध्ये राहणे हा एक अविस्मरणीय अनुभव तुम्ही घेऊ शकता.

Srinagar

नैनीताल

नैनीताल हे 'तलावांचे शहर' म्हणून ओळखले जाते. 'नैनी लेक'मध्ये तुम्हाला बोटिंगचा आनंद घेता येईल.

Nainital

मसूरी

भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे मसूरी. हिमालयाच्या सुंदर दृश्यांसाठी हे ठिकाण नक्की निवडा

Mussoorie

औली

औली हे भारतातील प्रसिद्ध 'स्कीइंग डेस्टिनेशन' म्हणून ओळखले जाते. मे महिन्यातील हिरवेगार दृश्य मनमोहक टाकते.

Auli

दार्जिलिंग

दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा, टॉय ट्रेन आणि कांचनजंगा पर्वताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. उन्हाळ्यात येथील हवामान अतिशय थंड असते.

Dargiling

गंगटोक

ईशान्य भारतातील एक सुंदर परिसर म्हणजे गंगटोक. गंगटोक येथे देश-विदेशातून पर्यटक येथे येतात.

Gangtok

शिलोंग

पूर्वचे स्कॉटलंड' म्हणून ओळखले जाणारे शिलोंग हे पांढरेशुभ्र धबधब्यांसाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Shilong

NEXT : विकेंडला फिरण्यासाठी लांब नकोच! मुंबईत सुरू झालंय देशातील पहिलं मँग्रोव्ह पार्क; जाणून घ्या कुठे आहे अन् कसं जायचं?

येथे क्लिककरा...