Manasvi Choudhary
मुंबईकरांसाठी पिकनीकसाठी नवे ठिकाण म्हणजे गोराईतील मँग्रोव्ह पार्क.
देशातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं उद्घाटन येत्या २८ मेला होणार आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्या जवळून आनंद घेण्यासाठी तुम्ही या पार्कला भेट देऊ शकता.
मँग्रोव्ह पार्कचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ७५० मीटर लांबीचा बोर्डवॉक आहे. हा मार्ग थेट खाडी किनाऱ्यापर्यंत पर्यटकांना घेऊन जाईल. जंगलातून चालण्यासाठी एक सुंदर आणि पर्यावरणपूरक लाकडी रस्ता आहे.
या पार्कमध्ये पर्यटकांसाठी १८ मीटर उंचीचा बर्ड वॉचिंग टॉवर बांधण्यात आले आहे. जिथून खाडीतील विविध प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी पाहता येतात.
लायब्ररी, कार्यशाळा, कॅफे, रूफटॉप रेस्टॉरंट या सुविधा तुम्हाला मँग्रोव्ह पार्कमध्ये भेटतील.
मँग्रोव्ह पार्क हे गोराई खाडीच्या जवळ आहे. मँग्रोव्हच्या जंगलातून चालण्यासाठी एक सुंदर आणि पर्यावरणपूरक लाकडी रस्ता बनवला आहे,