Manasvi Choudhary
डायबिटीज होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते, ते तुम्ही वेळीच ओळखणे महत्वाचे आहे.
डायबिटीजची लक्षणे ही पायांमध्ये दिसतात. नेमकी कोणती लक्षणे आहेत हे जाणून घेऊया.
पायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. सहसा रात्रीच्यावेळी हा त्रास अधिक होतो.
पांयाच्या घोट्यामध्ये वेदना होणे हे खराब नसांना त्रास होणारे हे एक लक्षण आहे.
मधुमेहामध्ये रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नसल्याने केस गळतात.
पायांमध्ये गुडघ्यावर तपकिरी किंवा गडद डाग टॅनिंगसाखे दिसू शकतात, परंतू मधुमेहामध्ये रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात.
स्नायूंना रक्तपुरवठा न झाल्यामुळे रात्री पायांना वेदनादायक पेटके येऊ शकतात.
पायांच्या पोटऱ्यांची त्वचा ताणलेली, सूजलेली दिसत असेल तर ते पायांमध्ये रक्तपुरवठा होत नाही असे दिसून येते.
मधुमेहामध्ये पायांवरील जखमा या लवकर बऱ्या होत नाही. कारण उच्च रक्तदाबामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.