Shreya Maskar
१०वीचा निकाल लागल्यानंतर ११वी ची ॲडमिशन प्रक्रिया सुरू होते.
अशात कॉलेजला जाताना मुलांमध्ये कोणते गुण असणे महत्त्वाचे आहे, जाणून घेऊयात.
कॉलेजमध्ये प्रवेश करून आपण मोठ्या जगात एन्ट्री मारतो, त्यामुळे स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा.
कॉलेजमध्ये सर्व प्रकारची मुलं असतात पण तुम्ही चांगल्या मुलांशी मैत्री करा.
कॉलेजमध्ये विविध प्रकारचे लोक वावरतात त्यामुळे चांगले कपडे घाला. फॅशन आणि ट्रेडच्या नावाखाली स्वतःला कंफर्टेबल वाटणार नाही असे कपडे घालू नका.
कॉलेजमध्ये स्वतःला ओळखा आपल्या कलागुणांना वाव द्या.
कॉलेजमध्ये प्रश्न विचारा, प्रश्नांपासून पळू नका. उत्तर शोधा.
कॉलेजमध्ये आपली भाषा आणि वागणुकीवर विशेष लक्ष द्या.