Shreya Maskar
तुम्ही लहान मुलांना स्टेशनरी गिफ्ट करू शकता. त्यांना पेन, पेन्सिल, पाऊच, रंगकामाचे साहित्य गिफ्ट करा. जे पाहून त्यांना आनंद होईल तसेच या वस्तूंचा उपयोगही होईल.
लहान मुलांसाठी पझल गेम्स भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे मुलांचे ज्ञान वाढते. बुद्धी तलक होते. विचार करायला वाव मिळतो. तसेच मुलांची स्मरणशक्ती वाढते.
तुमच्या मुलांना वाचनाची आवड असेल तर छान कवितांची, गोष्टींची पुस्तके गिफ्ट करा. ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
तुमच्या मुलांना कोणताही छंद असेल तर त्या संबंधित वस्तू गिफ्ट करा. उदा, गीतार, चित्रकलेच्या वस्तू, खेळणी
लहान मुला-मुलींना कार-टेडी बियर खूप आवडतात. त्यामुळे हा गिफ्टचा चांगला पर्याय आहे. यात अनेक रंग, व्हरायटी आणि आकार तुम्हाला मिळतील.
तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे गिफ्ट करू शकता. उदा. टॉप, जीन्स ट्रेंडी फॅशनचा यात समावेश करा. जेणेकरून मुलं आवडीने घालतील.
तुम्हाला मुलांसाठी एखादी खास आणि महागडी भेटवस्तू द्यायची असेल तर सोन्याचे दागिने उत्तम पर्याय आहे. उदा. कानातले, गळ्यातील चैन. भविष्यात तुमच्या मुलांसोबत ती गोष्ट कायम राहील.
तुम्ही मुलांना बॅग, वॉच, शूज गिफ्ट करू शकता. तसेच सनग्लासेस हा देखीसल गिफ्टचा एक चांगला पर्याय आहे.