Diwali Destinations : दिवाळीत फिरायला जायचंय? मग भारतातील 'ही' १० ठिकाणं एकदा नक्की पाहा

Shreya Maskar

दिवाळीची सुट्टी

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत तुम्हाला कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल आणि भारतातील सर्वात सुंदर दिवाळी पाहायची असेल तर 'ही' ठिकाणे बेस्ट आहेत.

Diwali | pinterest

अयोध्या

उत्तर प्रदेशमधील अयोध्या दिवाळीसाठी बेस्ट आहे. येथे भव्य दीपोत्सव पाहायला मिळतो. सरयू नदीच्या घाटांवरील दिव्यांची रोषणाई पाहून तुम्ही प्रसन्न व्हाल.

Ayodhya | pinterest

वाराणसी

वाराणसीला गेल्यावर गंगा घाट, आरती यांचा आध्यात्मिक अनुभव नक्की घ्या. जुन्या शहरातील मंदिरांना भेट द्या. येथे दिवाळीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

Varanasi | pinterest

जयपूर

राजस्थानमधील जयपूर म्हणजे निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा. येथे राजेशाही थाट अनुभवता येतो. हवा महल आणि सिटी पॅलेस पाहा. राजस्थानी खाद्यपदार्थ आणि पारंपरिक मिठाईचा आस्वाद घ्या.

Jaipur | pinterest

उदयपूर

उदयपूरला गेल्यावर तलाव, राजवाडे पाहा. येथे एक रोमँटिक वातावरण अनुभवता येते. पिछोला तलावाच्या परिसरात संध्याकाळ घालवा. सिटी पॅलेस आणि जुन्या शहरातील रस्ते पाहा. तलावाकाठी सुंदर फोटोग्राफी करा.

Udaipur | pinterest

गोवा

दिवाळीत गोव्याला गेल्यावर बागा, कलंगुट किंवा दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना भेट द्या. स्थानिक बाजार आणि गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्या.

Goa | pinterest

कोलकाता

पश्चिम बंगालमधील कोलकाता दिवाळीत नक्की फिरा. काली घाट मंदिराला भेट द्या. काली पूजेसाठी सजवलेले मंडप पाहा. बंगाली मिठाई आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.

Kolkata | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Diwali | pinterest

NEXT : दिवाळीत प्लान करा फॉरेन ट्रिप, थायलंडच्या निसर्ग सौंदर्याचा घ्या आनंद; ७ दिवसांत फिरा सुंदर बीच, मंदिरे अन् बेटं

Diwali Vacation | AI PHOTO
येथे क्लिक करा...