Alibaug : उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी बेस्ट आहेत अलिबागचे 'हे' १० बीच

Alisha Khedekar

अलिबाग बीच

अलिबाग शहराजवळील हा प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. सुंदर सूर्यास्त, कोलाबा किल्ल्याचे दृश्य आणि घोडेस्वारी, पॅरासेलिंगसारख्या अ‍ॅक्टिव्हिटींसाठी पर्यटकांना कायम आकर्षित करतो.

Famous Alibag Beach | Saam Tv

नागाव बीच

नागाव बीच हा रुंद आणि सपाट किनारा असून जेट स्कीइंग, बनाना राईडसारख्या वॉटर स्पोर्ट्समुळे मित्रमंडळी आणि कुटुंबांसाठी एकदम परफेक्ट आणि मजेदार ठिकाण ठरतो

Alibag Nagaon beach | Saam Tv

किहिम बीच

निसर्गरम्य किहिम बीच पक्षीनिरीक्षण आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हा किनारा एक अद्भुत अनुभव देणारा ठरतो.

Alibag Kihim Beach | Saam Tv

काशिद बीच

पांढरी शुभ्र वाळू असलेला काशिद बीच मालदीवसारखा भासतो. कॅम्पिंग, एटीव्ही राईड आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Alibag Kashid Beach | Saam Tv

मांडवा बीच

मुंबईहून फेरीने सहज पोहोचणारा मांडवा बीच आधुनिक कॅफे, बीच क्लब आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी ओळखला जातो, त्यामुळे वीकेंड ट्रिपसाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.

Mandwa Beach Alibag | Saam Tv

अक्षी बीच

अक्षी बीच शांत, स्वच्छ आणि कमी गर्दीचा असून कुटुंबांसाठी सुरक्षित आहे. येथे निवांत फेरफटका, मासेमारी आणि समुद्रकिनारी आराम करण्याचा आनंद घेता येतो

Akshi Beach Alibag | Saam Tv

वारसोली बीच

नारळाच्या झाडांनी वेढलेला वारसोली बीच स्वच्छ आणि कमी गर्दीचा आहे. त्यामुळे शांत वेळ घालवण्यासाठी आणि सुंदर सूर्यास्त अनुभवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

रेवदंडा बीच

रेवदंडा बीच किल्ला, काळी वाळू आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी आणि साहसी प्रवाशांसाठी खास आकर्षण ठरतो

Varsoli Beach Alibag | Saam Tv

अवास बीच

अवास बीच हा अत्यंत शांत ठिकाण असून फोटोग्राफी, समुद्रकिनारी चालणे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी परफेक्ट पर्याय आहे

Aavas Beach Alibag | Saam Tv

सासवाने बीच

सासवाने बीच शांतता, कला आणि निसर्ग यांचे सुंदर मिश्रण आहे. येथे ध्यान, सायकलिंग आणि आर्ट पाहण्याचा वेगळाच अनुभव मिळतो.

Sasvane Beach Alibag | Saam tv

NEXT : रत्नागिरीत लपलेले ५ किल्ले, उन्हाळ्याच्या सुट्टीत करा इतिहासाची सफर

Ratnagiri Tourism | saam tv
Ratnagiri Tourism : रत्नागिरीत लपलेले ५ किल्ले, उन्हाळ्याच्या सुट्टीत करा इतिहासाची सफर