Surabhi Jayashree Jagdish
दाताचा त्रास इतका तीव्र असतो की त्याचा परिणाम थेट संपूर्ण चेहऱ्यावर होतो. दातदुखी हा खूपच असह्य आणि भयंकर वेदना देणारा त्रास आहे.
चला तर मग जाणून घेऊ या या त्रासातून घरच्या घरी आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय.
जर दातात खूप वेदना होत असतील, तर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने दात आणि हिरड्यांमधील सूज कमी होते.
लसूण वाटून त्याचा पेस्ट तयार करा आणि दुखत असलेल्या भागावर लावा. लसूणातील जंतूनाशक गुणधर्मामुळे संसर्ग कमी होतो.
कापसावर लवंग तेल लावून दुखऱ्या दातावर ठेवल्यास लगेचच आराम मिळतो. हा एक नैसर्गिक आणि सर्वोत्तम उपाय आहे.
पुदिन्याच्या पानांमुळे फक्त खाण्याचा स्वाद वाढत नाही, तर त्याच्या ताज्या पानांचा चावा घेणे किंवा पुदिन्याचा चहा पिणे दातदुखीत आराम देते.
कापडात बर्फ बांधून दुखत असलेल्या भागाजवळ ठेवल्यास सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात. यामुळे फक्त ५ मिनिटांत आराम मिळू शकतो.
दातदुखीने त्रस्त असणाऱ्यांनी कांद्याचा रस दुखत असलेल्या भागावर लावावा. यामुळे जंतू नष्ट होतात आणि वेदना कमी होतात.
हळद पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि दातावर लावा. हा नैसर्गिक पेनकिलरप्रमाणे काम करतो.